शनिवारी नवीन 26 रुग्णांची भर : नव्या परिसरात सापडले नवे रुग्ण
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत असून शनिवारी शहरात 21 ग्रामीण भागातून 5 असे 26 पॉझिटिव सापडले आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 157 झाली आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात मागील आठ दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दररोज मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. शुक्रवारी 13 रुग्ण पॉझिटिव्ह आले तर शनिवारी ही संख्या दुप्पट होऊन 26 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये 16 पॉझिटिव्ह रॅपिड अँटीजन टेस्टमधून सापडले आहेत. शहर व तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 157 झाली आहे.
शनिवारी पंढरपूर शहरातील तानाजी चौक, कडबे गल्ली, शिंदेशाही, रेल्वे स्टेशन, महात्मा फुले चौक, रोहिदास चौक, आनंदनगर, गोविंदपुरा, गांधी रोड पोलीस लाईन या परिसरातील तर ग्रामीणमध्ये एकलासपुर, पुळुज येथील पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
शहरातील 91 तर ग्रामीण च्या 23 रुग्णांवर सध्या एम आय टी कोविड सेंटर येथे आणि 17 लोकांवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. आजवर 39 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.