राजगृह हल्ला आणि दलित अत्याचार निषेधार्थ पंढरीत रिपाइंचे धरणे आंदोलन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दलित अत्याचाराच्या घटना आणि मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी करन्यात आलेल्या हल्ल्याचा
पंढरपूर येथे रिपाइंच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी रिपाइंचे जेष्ठ नेते सुनील सर्वगोड यांनी, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यापासून दलित आणि बौद्ध समाजावरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली.


त्याचबरोबर भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

या वेळी रिपाइं युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. किर्तीपाल सर्वगोड, युवा आघाडीचे प्रदेश संघटक दीपक चंदनशिवे, जेष्ठ नेते नंदकुमार सोनंदकर, नगरसेवक महादेव भालेराव, शहराध्यक्ष अरविंद कांबळे, जिल्हा संघटक संजय सावंत, युवा आघाडी शहराध्यक्ष आतिष हाडमोडे, रामभाऊ गायकवाड, नाथा बाबर, दत्ता वाघमारे, ऍड महेश कसबे, राहुल गाडे, मुकुंद मागाडे,सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!