पंढरपूरच्या नव्या पेठेत जमीन खचली

10 फुटांचा मोठा खड्डा : पाणी 2 फुटांवर आले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील नव्या पेठेत झेंडा चौकात आज सायंकाळी अचानक जमीन खचली असून सुमारे 10 फूट खोल खड्डा पडला आहे. भर बाजार पेठेत ही घटना घडली असली तरी कोणतीही दुर्घटना मात्र घडली नाही.

पंढरपूर शहरात नव्या पेठेत झेंडा चौक आहे. या ठिकाणी आज ( बुधवारी ) सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास गांडूळे यांच्या चुरमुरे दुकाना समोर अचानक जमीन खचली आणि 10 फूट खोल आणि 6 ते 8 फूट रुंद खड्डा पडला. खड्डा पडल्यानंतर पाणी दोन फुटांवर आले. अचानक जमीन खचल्याने बाजारात एकच खळबळ उडाली आणी बघ्याची गर्दी उसळली.

नगरपालिकेत ही घटना समजताच मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, नगर अभियंता पवार दाखल झाले. त्यांनी लागलीच ब्रेकेट्स उभा करून खड्डा बुजवून घेण्यास सुरुवात केली आहे.

या ठिकाणी जुन्या काळात मोठा नाला असावा आणि यंदा अतिवृष्टी झाल्याने त्या ठिकाणची जमीन खचली असावी अशी शक्यता मुख्याधिकारी मानोरकर यांनी व्यक्त केली. मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली असून बघ्याची गर्दी उसळली होती.

Leave a Reply

error: Content is protected !!