पंढरपूर शहरात आणखी 4 पॉझिटिव्ह

रुग्ण संख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर


पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात आणखी चार लोकांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता 29 झाली आहे. तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्या 13 एवढी झाली आहे.
पंढरपूर शहरातील कोरोना संशयितांचे swab तपासणी अहवाल प्रलंबती होते. त्यापैकी रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार शहरात आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हे 4 रुग्ण संत रोहिदास चौक 2, झेंडे गल्ली 1 ,मंदिर परिसर 1 अशा भागात आढळून आले आहेत.
शहरात यापूर्वी 25 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, ग्रामीण भागात 13 तर अन्य तालुक्यातील आणि परजिल्ह्यातून आलेले असे 7 एकूण 45 रुग्ण सापडले आहेत, त्यात नव्याने2 4 रुग्ण वाढल्याने शहर व तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे. त्यातील 23 लोकांवर उपचार सुरू आहेत आणि 21 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!