वीरशैव सभा संघटनेच्या वतीने आ. भालके यांच्या हस्ते सन्मान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शहरात कोरोना काळात डॉ. श्री. शीतल पाटील व त्यांच्या सुवीद्य पत्नी डॉ. सौ. संगीताताई पाटील यांचे कार्य पाहून महाराष्ट्र वीरशैव सभा संघटनेच्यावतीने त्या डॉक्टर दाम्पत्याचा आम. भारत भालके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वतःचा वैयक्तिक खाजगी दवाखाना संभाळत असतानाच, गेल्या सहा महीन्यांपासुन सामाजिक बांधिलकी जपत अगदी नि:शुल्क सेवा देण्याचे काम हे डॉ. पाटील दाम्पत्य करत आहे.
जेव्हापासून आपल्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांना Home isolate करण्यात येऊ लागले, तेव्हापासून हे दाम्पत्य अशा रुग्णांच्या घरोघरी जावून सेवाभावी वृत्तीने उपचार करीत आहेत. आजमितीस डॉ. पाटील दाम्पत्य मात्र उदारमनाने तब्बल २६१ Home isolate पेशंटवर पुर्णपणे मोफत उपचार करत आहेत.
महाराष्ट्र वीरशैव सभा या संघटनेच्या वतीने त्यांचा आ. सन्माननीय भारत भालके यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. आमदार भालके यानी डॉ. पाटील दाम्पत्य व त्यांच्या टिमबरोबर चर्चा करत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. Covid warrior म्हणून कार्यरत असताना जे काही वैद्यकीय साहित्य हवे असेल, ते त्वरीत उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील दिली. याप्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे, वीरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष सुरज पावले, रेखा चंद्रराव, संध्या साखी, तुकाराम खंदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.