शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात 60 पॉझिटिव्ह रुग्ण


एकूण संख्या झाली 2 हजार 95

पंढरपूर : ईगल आय मिडिया

पंढरपूर शहर आणि तालुक्यात शुक्रवारच्या तपासणी अहवालानुसार 60 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच तालुक्यातील एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 2 हजार 95 झाली आहे तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत तपासणी केलेल्या रुग्णांचे अहवाल आज शनिवारी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार आजचे रुग्ण शहरातील काळा मारुती मंदिराजवळ, नवी पेठ, माऊली नगर, मनीषा नगर, महावीर नगर, लिंक रोड, लक्ष्मी टाकळी, जुनी माळी गल्ली, इसबावी, गुरुदेव नगर, डाळे गल्ली, कॉलेज चौक, चौफळा, भोसले चौक, बडवे गल्ली, अंबिका नगर या भागात सापडले आहेत तर, ग्रामीण भागात खर्डी, कासेगाव, करोळे, करकम्ब, गोपाळपूर, गादेगाव, एकलासपूर, देगाव, भंडीशेगाव, आंबेचिंचोली येथे सापडले आहेत. तालुक्यातील गाडेगाव येथील एक 80 वर्षीय इसमाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
सध्या तालुक्यात 2 हजार95 रुग्ण आहेत, त्यापैकी 1422 रुग्ण बरे झाले आहेत तर 635 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!