ठाण्याहुन आलेला 1 जण करकम्ब येथे पॉझिटिव्ह
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरासाठी धक्कादायक बातमी असून शहरात स्थानिक नागरिक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण एका सहकारी बँकेत संचालक असून 8 दिवसांपूर्वी त्याची आरोग्य तपासणी खुद्द तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली होती. त्यामुळे संबंधित बँकेच्या संचालक, कर्मचारी यांना ही क्वारन्टीन होण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
पेशाने शिक्षक असलेल्या या व्यक्तीची आरोग्य तपासणी 8 दिवसांपूर्वी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली होती. त्यावेळी स्वतः डॉक्टर असलेल्या वाघमारे यांनी त्या रुग्णाची तपासणी करताना पुरेशी काळजी घेतली होती आणि त्यानंतर त्यांना त्या रुग्णामध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून आल्याने संबंधित रुग्णाचा swab घेण्याची सूचना आरोग्य विभागास केली होती.
बेलीचा महादेव परिसरात वास्तव्य असणाऱ्या त्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. बेलीचा महादेव मंदिर परिसरात प्रतिबंधित भाग म्हणून आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, करकम्ब येथील एका रुग्णास कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले असून ठाणे येथून आलेल्या या व्यक्तीला सध्या mit कोरोना केअर सेंटर येथे दाखल केले आहे. करकंब येथील एकजण ठाणे येथे वाहन चालक म्हणून काम करत होते. तो राहत असलेल्या खोलीतील इतरांना कोरोनाची लागण झाल्याने तो करकंब येथे गुरुवार (दि. २५जून) रोजी रात्री आला होता.
करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.तुषार सरवदे यांनी तातडीने योग्य ती खबरदारी घेत शुक्रवारी सकाळी त्यांचा व करकंब मधील इतर एका व्यक्तीचा स्वब घेऊन सोलापूर ला पाठवले होते, त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून करकंब व्यक्तीचा अहवाल निघेटिव्ह तर ठाणे येथून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. स्वाब घेऊन त्या रुग्णास वाखरी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असले तरी मात्र ठाण्यावरून आल्यापासून सदर व्यक्ती जास्त व्यक्तीच्या संपर्कात आलेली नाही.
सदर ठाणे येथून आलेला रुग्ण थेट रुग्णालयात आल्याने त्याचा कुटुंबातील किंवा गावातील व्यक्तींचा संपर्क झाला नाही.
डॉ तुषार सरवदे
वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय करकंब
आषाढी च्या तोंडावर पंढरीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.