मनसेच्या महिला मोर्चाने पंढरी दणाणली

महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्याची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या नेत्रवत्वाखाली महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे प्रचंड मोठा रेकॉर्ड ब्रेक हजारो महिलांचा मोर्चा काढण्यात आला.

मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघाला

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सामील झालेल्या होत्या. स्टेशन रोडने हा मोर्चा तहसीलदार कचेरीवर धकडला. यावेळी मनसेचे सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी मार्गदर्शन करताना लॉक डाऊन काळात महिलांचे स्वयंरोजगार बुडाले आहेत. त्यामुळे सर्वच बचत गट आर्थिक अडचणीत आले आहेत. केंद्र सरकार बड्या उद्योगपतींना कर्जमाफी देते मग या महिलांना का नाही ? असा सवाल करून महिला बचत गटाची कर्जे माफ करण्याची मागणी केली.

यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, सिद्धेश्वर गरड, सौ निकिता पवार, सौ रंजना इंगोले, सौ पूजास लावंगकर, महेश पवार , सागर घोडके, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अनविता गायकवाड, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, अमोल झाडगे, अप्पा करचे, सतीश दिडवाघ, अनिल केदार, बालाजी वाघ, दिलिप पाचंगे, दीपाली थोरात,नागेश इंगोले इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

error: Content is protected !!