पंढरपूर शहर, तालुक्यात आज 20 पॉझिटिव्ह रुग्ण

नवी गावे, नवे रुग्ण पंढरपूर तालुक्यात ” दस ” बहाने करून घुसतोय कोरोना

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात कोरोनाने हात पाय पसरलेले असताना आता नवीन गावांतून, नव्या लोकांना कवेत घेत कोरोना आपला विळखा वाढवत आहे. पंढरपूर तालुक्यातील व्होळे, लक्ष्मी टाकळी या नव्या गावात नवे लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्याचबरोबर करकम्ब, गोपाळपूर, गुरसाळे या जुन्या गावात नव्याने रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
यातील गुरसाळे, करकम्ब येथील रुग्ण जुन्या रुग्णांच्या संपर्कातील आणि क्वारंटईन केलेले आहेत,त्यामुळे त्यांची साखळी तुटली आहे,मात्र व्होळे, लक्ष्मी टाकळी आणि गोपाळपूर येथे नवीन लोक पॉझिटिव्ह आले असून आता त्यांची सम्पर्क साखळी शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभा राहीले आहे.
दरम्यान, पंढरपूर शहरातही नव्याने किमान 14 लोक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून या लोकांच्या संपर्क साखळीतील लोकांना शोधण्याची मोहीम आखली जात आहे. बागवान गल्ली, संत पेठ या भागातील 5 पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात ही आज 14 पॉझिटिव्ह वाढले आहेत. आणि नवीन गावासह ग्रामीण भागात नवीन 6 रुग्ण बुधवारी समोर आले आहेत.

सकाळी ८ वाजता आलेली अपडेट्स

ग्रामीणमध्ये संपर्क व्यक्ति ५ ( करकंब, गोपाळपुर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक) तर जगदंबा नगर टाकळी येथे नवीन लक्षणे असलेला रुग्ण.

शहरांमध्ये एकूण 14 रुग्ण (त्यापैकी 13 संपर्क व्यक्ती तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण) संपर्क व्यक्ती महापुर चाळ संत पेठ पंढरपूर ५, गांधी रोड पंढरपूर १, संत पेठ १ घोंगडे गल्ली १,ज्ञानेश्वर नगर २, बागवान गल्ली सांगोला रोड ३, तर नवीन लक्षणे असलेला शांतीनगर,लिंक रोड १ रुग्ण.

Leave a Reply

error: Content is protected !!