पंढरपूर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण झाले 276
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरूवारी रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात नव्याने 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर वाखरी येथे नवीन 3 भंडीशेगाव येथे 2 असे 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर या अहवालात एकूण 63 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 276 एवढी झाली झाली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी 15 लोकांचे swab टेस्टिंग अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
गुरुवारी रात्री उशिरा आणखी 73 एवढ्या लोकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी शहरात 5 तर ग्रामीम भागात 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गोविंदपुरा, तानाजी चौक, सांगोला रोड येथील हे रुग्ण आहेत.
ग्रामीण भागात वाखरी येथे यापूर्वी सापडलेल्या पुरुष रुग्णांच्या कुटुंबातील 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावातील एकूण रुग्ण संख्या 6 झाली आहे. तर भंडीशेगाव येथे आणखी 2 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या गावातील रुग्ण संख्या 3 वर गेली आहे. हे दोन्ही पती पत्नी आहेत.
पंढरपूर शहरात आणखी 5 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकूम रुग्ण 200 झाले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या 276 पर्यंत पोचली आहे .
सध्या तरी पंढरपूर पुर्ण पणे 14 दिवस बंद ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे.
really