चेस दि व्हायरस मोहिमेस प्रतिसाद : पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 980
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने शनिवारी घेण्यात आलेल्या अँटीजन टेस्ट मध्ये 803 टेस्ट घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 114 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पंढरपूर ची कोरोना पॉझिटिव्ह संख्या 980 वर पोहोचली आहे.
पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शहरात 7 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. दरम्यान नगरपालिकेने चेस दि व्हायरस मोहिमेनुसार शहरात कोरोना अँटीजन टेस्ट सुरू केल्या आहेत. शनिवारी शहरातील संत गजानन महाराज मठ, मनीषा नगर या भागात रॅपिड टेस्टस करण्यात आल्या. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येईल याची भीती न बाळगता, न घाबरता , सोशल डिस्टनसिंग पाळून रॅपिड तपासणी करून घेतली. दिवसात 803 टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये 114 लोक पॉझिटिव्ह आढळून आले. रॅपिड टेस्ट मुळे लक्षणे दिसत नसूनही पॉझिटिव्ह असलेले 114 लोक सापडले, त्यांच्यामुळे निर्माण होणारा नवीन संसर्गही थांबला आहे. गेल्या दोन दिवसांत शहर व तालुक्यात सुमारे 300 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्या तुलनेत मृत्यू खूपच कमी असल्याने कोरोनाबाबत लोक जागृत होत असले तरी भीती कमी होत असल्याचे दिसते. प्रशासनाच्या या चेस दि व्हायरस मोहिमेचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.