पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यात आज ( दि. 29 जून ) रोजी सर्वच मंडलात पावसाने हजेरी लावली आहे. भंडीशेगाव सर्कलमध्ये सर्वाधिक तर पटवर्धन कुरोली सर्कलमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे.
गेल्या दोन दिवस अल्प विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मध्यरात्री 1 वाजल्यानंतर सर्वत्र दमदार हजेरी लावली. मध्यरात्री 1 वाजता सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर कोसळत होता. त्यामुळे अनेक भागात शेतात पाणी साठल्याचे दिसून येत आहे.
भांडीशेगाव सर्कलमध्ये सर्वाधिक 47 मिमी, पंढरपूर सर्कलमध्ये 40 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
पंढरपूर तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस खालीलनुसार आहे.
करकंब 22 मिमी
पट कुरोली 7 मिमी
भंडीशेगाव 47 मिमी
भाळवणी 22 मिमी
कासेगाव 7 मिमी
पंढरपूर 40 मिमी
तुंगत 22 मिमी
चळे 9 मिमी
पुळुज 10 मिमी
एकूण पाऊस 186 मिमी झाला असून सरासरी पाऊस 20.66 मि. मी. इतका नोंदवला गेला आहे.
29 जून अखेर तालुक्यात सरासरी पाऊस 158.82 मिलिमीटर इतका झाला असून जुन महिन्याची सरासरी ओलांडली आहे.
गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.