सर्व सर्कल्स मध्ये 142 मिमी पर्यंत कोसळला
पंढरपूर : ईगल आय मीडिया
बुधवारी दिवसभर नुसता पाऊस आणि पाऊसच बरसत होता. गावात, गल्लीत आणि घरातही पाऊस आणि पाणीच पाणी झाले आहे. एका दिवसात तालुक्यातील सर्व 8 ही सर्कल्स मध्ये 145 मिमी सरासरी एवढा पाऊस कोसळला असून असा पाऊस1 अभूतपूर्व असल्याचे सांगितले जाते.
बुधवारी तालुक्यात झालेल्या पावसाची मिलिमीटर मध्ये नोंद अशी आहे.
करकंब 125 मिमी.
पट कुरोली 130 मिमी.
भंडीशेगाव 142 मिमी.
भाळवणी 147 मिमी.
कासेगाव 141 मिमी.
पंढरपूर157 मिमी.
तुंगत 127 मिमी.
चळे 152 मिमी.
पुळुज 156 मिमी.
एकूण पाऊस 1277 मिमी.
सरासरी पाऊस 141.89मि.मी. इतका धुवांधार पाऊस झाला आहे.
परतीच्या पावसाने बुधवारी पंढरपूर तालुक्यात नुसता धुमाकूळ घातला आहे. बुधवारी दिवसभर आणि रात्रीही पाऊस कोसळत होता. त्यामुळे पंढरपूर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले, सगळे रस्ते, चौक पाण्याची तळी झाले होते. तर ग्रामीण भागात पिके वाहून गेली, रस्ते वाहून गेले, लोकांच्या घरातही पाणी झाले. संपूर्ण दिवसभर लोकांना घराबाहेर पडता आले नाही एवढा अभूतपूर्व पाऊस पडला आहे.
एकाच दिवशी सर्वदूर भागात अशा पद्धतीने प्रथमच2पाऊस अनुभवला आहे. एरवी पाऊस सुखावह असतो मात्र बुधवार चा पाऊस भयावह होता. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज अद्याप आलेला नाही. मात्र चंद्रभागा तीरावर भिंत कोसळून 6 जण दगावले हे नुकसान न भरून निघणारे आहे.