अनु.जमाती वगळता इतर आरक्षण पुन्हा काढण्याचे आदेश

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे फेर आरक्षण काढण्यात येणार असून अनु जमाती चे यापूर्वी काढलेले आरक्षण कायम ठेवून इतर सर्व ग्रामपंचायतीचे आरक्षण पुन्हा काढण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे सध्या पडलेल्या आरक्षणानुसार सरपंच पदाची तयारी केलेल्या सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण २७ जानेवारी रोजी काढणेत आले होते. मात्र यावेळी काही गावांचे आरक्षण चुकीचे पडल्याचे आरोप करीत या चुकिच्या आरक्षणाबाबत तालुक्यातील सुपली, गादेगाव, उंबरे – पागे, उपरी, नारायण चिंचोली, गावातील नागरिकांनी ऍड. विजय जाधव यांचेवतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत आरक्षण बदलण्याची मागणी केली होती. यावर जिल्हाधिका-यांनी सुनावणी घेणेचे आदेश न्यायालयाने दिले होते.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सुनावणी पुर्ण केली. सुनावणी दरम्यान देखील सुपली, गादेगाव, उंबरे पागे, उपरी, नारायण चिंचोली चे आरक्षण बदलण्याचा युक्तिवाद एड. विजय जाधव यांनी केला. जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर तालुक्यातील अनुसुचित जमाती व अनुसुचित जमाती महिलेसाठी काढणेत आलेले आरक्षण कायम केले आहे. माञ अनुसुचित जाती, ना.मा. प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी नव्याने आरक्षण काढणेचा आदेश दिला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील आरक्षण बदलणार असुन दि २२ फेब्रुवारी रोजी नव्याने आरक्षण काढणेत येणार आहे.