9, 11 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार नूतन सरपंच निवडी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार 9, 11 आणि 13 फेब्रुवारी या तारखांना नूतन सरपंच निवडी होणार आहेत.
त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अध्यासी अधिकाऱ्यांच्या नेमणुका बुधवारी जाहीर केल्या. तालुक्यातील 74 पैकी 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर 73 ग्रामपंचायत निवडणुका शांततेत संपन्न झाल्या आहेत. आता सरपंच, उपसरपंच निवडीसाठी मोर्चे बांधणी आणि रस्सीखेच सुरू आहे.
तालुक्यातील कासेगाव, करकम्ब भाळवणी, खर्डी, भोसे, सुस्ते, वाखरी अशा महत्वाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच कोण होतात याकडे तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. येत्या 9, 11 आणि 13 फेब्रुवारी रोजी निवडी होणार आहेत.