पंढरपूर कोरोनाचा कहर : एकाच दिवसात 50 पॉझिटिव्ह

एकूण रुग्ण संख्या 211

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोमवारचा दिवस पंढरपुरकरांना धक्का देणारा असून एकाच दिवसात तालुक्यातील एकूण 50 लोकांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामुळे शहर व तालुक्यातील रुग्णांची संख्या 211पर्यंत पोचली आहे . रविवारी केवळ 5 लोकांचे अहवाल आले होते. त्यापैकी 4 पॉझिटिव्ह होते. मात्र
सोमवारी एमआयटी कोविड सेंटर येथे 90 लोकांचे रॅपिड एंटीजन टेस्ट घेण्यात आले. त्यापैकी 40 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील 1 कुटुंबातील तब्बल 15 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. तर भटुंबरे , भोसे, तारापूर, सरकोली येथील एक जण पॉझिटिव आल्याची प्राथमिक माहिती हाती आले आहेत. यापूर्वीच तर शहरातील संतपेठ, महावीर नगर, उमदे गल्ली, पोलीस line, डोंबे गल्ली, रोहिदास चौक, हरिणारायन पार्क, लक्ष्मी नगर, मनीषा नगर, जुनी पेठ, आनंद नगर, इसबावी, कालिकादेवी मंदिर परिसरात नवीन रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील 161 रुग्ण करून पॉझिटिव आलेले आहेत तर त्यातील 46 लोकांना आजवर उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेले आहे. सोमवारी एकूण 50 अहवाल पॉझिटिव आल्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दोनशे अकरा झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!