पांडुरंग’चे “ऊस भुषण” पुरस्कार जाहीर !

आज ऑनलाईन वार्षीक सर्वसाधारण सभा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी पांडुरंग ऊस भुषण व पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचे स्वरुप पांडुरंग ऊस भुषणसाठी रक्कम रु.५१ हजार व पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कारसाठी रक्कम रु.११ हजार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा असे आहे. या पुरस्कारामध्ये विजेत्या शेतकऱ्यास गौरविण्यात येते.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या संकल्पनेतून व दरवर्षी कमीत-कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक साखर उताऱ्याचा व अधिक ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यास ”पांडुरंग ऊस भुषण” पुरस्कार’ व ”पांडुरंग आदर्श शेतकरी” पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो.

गळीत हंगाम २०१९-२० मध्ये १० सभासद व गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये १० सभादांनी भाग घेतला होता. त्यामधुन गळीत हंगाम २०१९-२० चा ”पांडुरंग ऊस भुषण” पुरस्कार श्री.राणू पाटील, (रा.आव्हे, गट-भोसे) यांना तर गळीत हंगाम २०२०-२१ ”पांडुरंग ऊस भुषण” पुरस्कार सौ.अनिता घाडगे (रा.देगांव, गट-देगांव) यांना जाहीर करण्यात आला आहे.

” पांडुरंग आदर्श शेतकरी” पुरस्कार’ यामध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्रातील एकुण ७ गटामधुन प्रत्येकी १ सभासद शेतकऱ्यास ”पांडुरंग आदर्श शेतकरी” पुरस्कार देऊन सन्मानित करणेत येते.

या पुरस्कारासाठी गळीत हंगाम २०१९-२० साठी महादेव घाडगे (रा.देगाव, गट-देगांव), ईश्वरा धुमाळ (रा.कौठाळी, गट- भाळवणी), नानासो सरवळे (रा.मेंढापूर, गट-भोसे), लक्ष्मण ढोबळे (रा.उंबरे पागे, गट-करकंब), लक्ष्मण दावले (रा.कासेगांव, गट-पंढरपूर) तर गळीत हंगाम २०२०-२१ साठी गोकुळ घाडगे (रा.देगांव, गट-देगांव), राजकुमार रेडे (रा.गादेगांव, गट-भाळवणी), ज्ञानेश्वर गोसावी (रा.नेमतवाडी, गट-भोसे), भगवान नरसाळे (रा.जळोली, गट-करकंब) यांना जाहीर झाले आहेत.

यामध्ये सन २०१९-२० मध्ये १८ व २०२०-२१ मध्ये २८ सभासद शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. प्रत्येकी रक्कम रु.११ हजार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा देऊन सपत्निक गौरविण्यात येणार आहे.

याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी हे म्हणाले की, ही स्पर्धा आम्ही गेले तीन वर्षापासून मा.आ.कै.सुधाकरपंत परिचारक यांचे संकल्पनेमधुन व कारखान्याचे चेअरमन आ.श्री प्रशांत परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली चालू केलेली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा शेतकरी कारखान्याचा सभासद असणे आवश्यक आहे. कारखान्याने ठरवून दिलेल्या को-८६०३२, कोसी-६७१, vsi-०८००५ या ऊस जातींचीच ऊस लागण करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील शेतकऱ्यांनी ऊसाची लागण केल्यापासून ऊस तोडणीपर्यंत १०० गुणांची तपासणी विविध मुद्यांचे आधारे करणेत येऊन हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शनुसार, परंपरेनुसार कारखाना चालू असून सन २०१९-२० मधील ”पांडुरंग ऊस भुषण” व ”पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार” कोवीड १९ च्या परिस्थितीमुळे देता आले नाहीत. त्यामुळे सन २०१९-२० व २०२०-२१ या हंगामासाठी हे पुर्व नियोजित पुरस्कार ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व नियम पाळून गुरुवार दि.३० सप्टेंबर रोजी देत आहोत.

आ.प्रशांत परिचारक, चेअरमन पांडुरंग सहकारी साखर कारखाना.

पुरस्काराचे वितरण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कारखान्याचे आज ( दि.३० सप्टेंबर ) रोजी होणाऱ्या ऑनलाईन वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये कारखाना कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन आ.श्री प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये वितरीत करणेत येणार आहे.

स्पर्धेतील शेतकऱ्यांना आ.प्रशांत परिचारक यांचे व कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, केन मॅनेजर संतोष कुमठेकर व ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, यांनी ऊस पीक घेत असताना विविध स्तरावर मार्गदर्शन केले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!