पांडुरंग’चा शेवटचा हफ्ता 206 रुपये

जेष्ठ सभासदांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्यावतीने गेल्या हंगामात गाळपास आलेल्या उसापोटी 206रुपये अंतिम हफ्ता जाहीर केला आहे. दोन दिवसापासून बिलाचे वाटप सुरू होणार आहे.बॉयलर प्रदीपन सोहळ्यात कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांनी ही घोषणा केली. गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन जेष्ठ 12 सभासदांच्या हस्ते संपन्न झाला.

श्रीपूर ( ता .माळशिरस ) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 2020 – 21 सालच्या गाळप हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभाच्या निमित्ताने सुधाकरपंत परिचारक यांच्या बरोबर काम केलेल्या जेष्ठ 12 शेतकरी, सभासदांना प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते बॉयलर प्रदीपन संपन्न झाले.

लक्ष्मण सोपान डुबल (अजनसोड )श्री ज्ञानोबा राजाराम शिंदे (रांजणी) श्री वसंत बाबुराव चव्हाण (बाभूळगाव) श्री शिवाजी दत्तात्रय देशमुख (कासेगाव) श्री ज्योतीराम रामचंद्र चव्हाण (बाभूळगाव) श्री दादा नारायण यलमर( सुपली) श्री धोंडीबा घनश्याम पाटील (आव्हे)श्री अनंत दिगंबर राजोपाध्ये( रांजणी) श्री संदिपान भीमराव वाडेकर (शिरगाव) श्री शामराव सखाराम लोखंडे (भंडीशेगाव) श्री सिताराम ज्ञानोबा बागल( गादेगाव)श्री आबासो जयवंत गायकवाड ( चि.भोसे) उपस्थित होते.

या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख, माजी चेअरमन दिनकर मोरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी उपस्थित होते.प्रणव परिचारक, आजी-माजी संचालक, विविध बँकेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती होते.

सत्यनारायण महापूजा कारखान्याचे विद्यमान संचालक श्री परमेश्वर गणगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाली. कार्यक्रमासाठी श्रीपूर,बोरगाव, महाळुंग मधील सर्व नेतेमंडळी, प्रतिष्ठित नागरिक ऊस उत्पादक सभासद व कामगार बंधू युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!