पंढरपूर : ईगल आय मीडिया
जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आ. प्रशांत परिचारक यांची निवड झाली आहे. आज ( दि.24 रोजी ) श्रीपुर येथे चेअरमन पदाची निवड संपन्न झाली.
या संदर्भात ईगल आय मीडिया संकेतस्थळावर बुधवारी देण्यात आलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांचे मागील महिन्यात निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन पदाची निवड करण्यात आली आहे. या संदर्भात कारखान्याच्या सभागृहात संचालक मंडळाची मीटिंग संपन्न झाली.
यावेळी सर्व संमतीने आ प्रशांत परिचारक यांनीच हे पद स्वीकारावे असे संचालक मंडळाने सांगितले. त्यानंतर निवडीची औपचारिकता पार पडली. मागील 5 वर्षाहून अधिक काळ जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक हे कारखान्याचे चेअरमन तर वसंतराव देशमुख हे व्हा. चेअरमन आहेत. पंतांच्या पश्चात आ.प्रशांत परिचारक यांची बिनविरोध निवड होत आहे.
साहेब अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹