बुधवारी पांडुरंगचा गाळप हंगाम शुभारंभ

जेष्ठांचा सन्मान : ” हे ” आहेत प्रमुख मान्यवर

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्रीपूर ( ता. माळशिरस ) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा येत्या बुधवारी ( दि.14 ऑक्टोबर ) रोजी गाळप हंगाम शुभारंभ होत असून यावेळी सुद्धा जेष्ठ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात येत आहे. पांडुरंग परिवाराचे प्रमुख माजी. आ.कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या 15 सहकाऱ्यांच्या हस्ते गाळप हंगाम सुरू होत आहे.

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 29 व्या गाळप हंगामाचा बुधवारी शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने कै. सुधाकरपंत परिचारक यांच्यासोबत काम केलेल्या जेष्ठ 15 व्यक्तींना मोळी पूजनाचा सन्मान दिला गेला आहे.

बाळशास्त्री हरिदास, बाळासाहेब बडवे, लक्ष्मीनारायण भट्टड, आनंदराव क्षिरसागर (चिंचुंबे ) परमेश्वर मस्के ( नारायण चिंचोली ) घनश्याम काटकर ( पट. कुरोली ) मारुती देशमुख ( करकम्ब ) सीताराम नागणे ( ओझेवाडी ) वसंत पाटील ( करोळे ) हरी खांडेकर ( शेंडगेवाडी ) बाळासाहेब गाजरे ( शेळवे ) मल्हारी वाघमारे ( पळशी ) भिमाशंकर भिंगे ( गार्डी ) बळवंत व्हरगर ( शिरढोन ) आणि वसंतराव बंडगर ( सोनके ) या 15 जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते मोळी पूजन आणि गव्हाणीत मोळी टाकून हंगाम सुरू होत आहे.

बुधवार दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आम. प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन वसंत देशमुख आणि कार्यकारी संचालक यशवन्त कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!