पांडुरंग परिवाराने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाण्याचे संचालक आणि परिचारक कुटुंबाचे निष्ठावन्त कार्यकर्ते भाळवणी ( ता. पंढरपूर ) येथील शिवाजी गवळी यांचे कोरोनामुळे आज ( मंगळवारी ) सायंकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान निधन झाले.
त्यांच्या निधनाने पांडुरंग परिवारात एक झुंजार, निष्ठावान कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे वय 48 होते. पत्नी, मुले, 3 भाऊ असा परिवार त्यांच्या पाठीमागे असून गेल्या महिन्या भरापूर्वी ते कोरोना बाधित झाले होते आणि तेंव्हापासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते.
भाळवणी गटातच नाही तर संपूर्ण पंढरपूर तालुक्यात शिवाजी गवळी हे नाव परिचित होते. त्यांच्या निधनाने पांडुरंग परिवाराने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.