पंढरपूर : ईगल आय मीडिया
पटवर्धन कुरोली ( ता. पंढरपूर) येथे दुध दरवाढ या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटना आणि भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
गावातील महादेव मंदिरात शिवलिंगावर दुग्ध अभिषेक घालण्यात आला.
यावेळी दुधाला 30 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, भारतीय जनता पार्टीचे गोपाल पाटील, प्रतापसिंह चंदनकर, स्वाभिमानीचे कांतीलाल नाईकनवरे, पप्पू नाईकनवरे, विलास खेडेकर, हनुमंत नाईकनवरे, प्रवीण नाईकनवरे, गणेश शिंगाडे, गणेश कोळसे व इतर दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.