सरपंच पदी गणेश उपासे, उपसरपंच पदी उज्वला पिंजारी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश उपासे तर उपसरपंचपदी उज्वला पिंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराने ११ पैकी ७ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली होती.
शुक्रवारी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. घुले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलविली होती. यावेळी सरपंच पदासाठी गणेश उपासे, उपसरपंच पदासाठी उज्वला पिंजारी यांचेच अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर विठ्ठल परिवार ७, परिचारक २, आ. बबनराव शिंदे प्रणित तिसरी आघाडी २ असे प्राबल्य असूनही काही सदस्यांनी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. मात्र विठ्ठल परिवारातील एकाही सदस्याला फोडण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे हा गावात चर्चेचा विषय होता.
यावेळी ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे, ग्रा. पं. सदस्य प्रियांका नाईकनवरे, नंदा मोरे, सुवर्णा डावरे, मिराबाई पाटील, शैला तवटे, हारूण शिकलकर, अनिल सावंत, दीपक नाईकनवरे यांच्यासह विठ्ठलचे संचालक उत्तमराव नाईकनवरे, माजी संचालक नंदकुमार पाटील, मोहन उपासे, माजी उपसरपंच ॲड. पांडुरंग नाईकनवरे, विक्रम उपासे, हनुमंत नाईकनवरे, भागवत उपासे, ॲड. संतोष नाईकनवरे, विठ्ठल उपासे, प्रसाद उपासे, तुकाराम उपासे, सतीश डावरे, हरिदास पाटील, बाळासाहेब गुंड-पाटील, अंकुश नाईकनवरे, समाधान उपासे, सागर नाईकनवरे, रमेश तवटे, विजय डावरे, अरविंद डावरे, गणेश पिंजारी, रामकृष्ण नाईकनवरे, शिवाजी नाईकनवरे, सिद्धू पाटील, निलेश देशमुख, हरिदास नाईकनवरे आदी उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून फटाके वाजविण्यात आले.