पटवर्धन कुरोली येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर ) येथे आद्य कवि रामायणकार महर्षि वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात महर्षि वाल्मिकींच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, राजेंद्र तवटे, माजी सरपंच अरविंद डावरे, माजी उपसरपंच अॅड. पांडुरंग नाईकनवरे, केशव नाईकनवरे, हरिदास पाटील, योगेश तवटे, सोसायटीचे माजी अध्यक्ष पांडुरंग जाधव, संजय सावंत, सुग्रीव कोळी, नोशाद शिकलकर, बाबासाहेब माने, ऋषिकेश कोळी, किशोर माने, तानाजी माने , सतीश सर्जे, उपस्थित होते.

पटवर्धन कुरोली प्रशाला – येथील पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात सुधाकर जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी पांडुरंग जवळेकर, विजय कोळी, सिध्दार्थ चव्हाण बजरंग माने, लक्ष्मण डावरे, प्रमोद कोळी,रामकष्ण कोळी, राहुल सर्जे उपस्थित होते. तर महर्षी वाल्मिकी संघ- येथील महर्षि वाल्मिकी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक कोळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे तानाजी कोळी, बजरंग माने, शहाजी माने, विश्वास जगताप, सचिन कोळी, कैलास कोळी, शामराव कोळी, आबा कोळी, पांडुरंग कोळी, नितीन कोळी, विशाल कोळी, लक्ष्मण कोळी, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!