पटवर्धन कुरोली परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी


दोन शेळ्या केल्या फस्त – शेतकरी नागरींमध्ये भीतीच वातावरण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पटवर्धन कुरोली ( ता. पंढरपुर ) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आहे. या प्राण्याने पटवर्धनकूरोली येथील शेतकरी विजय मोरे यांची शेळी व शेवते येथील शेतकरी चंद्रकांत तोंडले यांचे बोकड फस्त केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


दोन दिवसापूर्वी शनी मंदिर परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याला संजय मगर यांच्या शेतात काही नागरिकांनि पाहिले होते. त्याच परिसरात वास्तव्य करणाऱ्या विजय मोरे यांच्या शेतातील वस्तीवरील शेळी या प्राण्याने फस्त केली.शिवाय दुसऱ्या दिवशी शेवते ( ता. पंढरपुर ) येथील शेतकरी चंद्रकांत तोंडले यांच्या वस्तीवर बोकड या प्राण्याने ओढत आणून शेजारील डाळिंबाच्या बागेत आणून अर्धवट अवस्थेत खाऊन टाकल्याचे आढळले. त्यामुळे शेतकरी नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.


शनी मंदिर परिसरात या प्राण्याला काही शेतकऱ्यांनी पाहिल्याचे सांगितले काहींनी याचे फोटो, व्हिडिओ ही शूट केले आहेत. हा प्राणी बिबट्याच आसल्याचे प्रत्यक्ष पाहणारेे सांगत आसून याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी शेकरी, नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!