टीम : ईगल आय मीडिया
इथेनाॅल संदर्भातील सर्व अडीअडचणी समजावून घेऊन लवकरच या संदर्भात नवीन धोरण तयार करून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचं आश्वासन, केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे.
आज ( दिनांक 5 ) रोजी नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे इथेनाॅल संबंधातील अडीअडचणी संदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद सदस्य आ. रणजितसिंह मोहिते – पाटील, आम. राहुल कुल यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक संपन्न झाली.
यावेळी ना. धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यातील इथेनॉल संदर्भातील अडचणी जाणून घेतल्या तसेच यावर लवकरच नवीन धरण तयार करण्यात येईल असेही सांगितले.