पिराची कुरोली च्या सरपंचपदी मुमताज शेख

उपसरपंचपदी रणजित लामकाने यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पिराची कुरोली (ता.पंढरपूर)येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुमताज नसीर शेख यांची तर उपसरपंचपदी रणजित पांडुरंग लामकाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


गत महिन्यात येथील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणत्याच गटाला बहुमत नसल्याने सरपंच कोण होणार याबद्दल
मोठी उत्सुकता लागली होती. मात्र येथील परिचारक, काळे-भालके,
बबनदादा शिंदे गटाने एकत्रित येत सरपंच व उपसरपंच पदाची
निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले.


त्यानुसार येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी नविन सदस्यांची
ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी नुतन सदस्य
दिपाली रामगुडे, योगेश होनमाने, अनिता कोलगे, कुलदिप कोलगे,
मुमताज शेख, सुवर्णा लामकाने, सतिष भूई, रणजित लामकाने,
महादेव सोनवले, वंदना सोनवले, रतन कोलगे, कल्याण सावंत, उषा
भूई हे तेराहि सदस्य उपस्थित होते.

यावेळी सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी मुमताज शेख व रणजित लामकाने यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी दोन्हीही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.

निवडी जाहिर होताच चारही गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव
साजरा केला. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या हस्ते
करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक मारूती भोसले, हवालदार
महिबुब शेख उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!