कोरोना विरोधी लढ्यात ११७ पोलिसांचे बलिदान


२४८ अधिकारी :१७३२ पोलीस कर्मचारी बाधित


टीम : ईगल आय मीडिया
राज्यात कोरोना विरोधात सुरु असलेल्या लढ्यात ११७ पोलीस बांधवानी बलिदान दिले असून यामध्ये सर्वाधिक ५२ पोलीस आणि ४ अधिकारी असे ५६ कर्मचारी मुंबईतील आहेत. अजूनही २४८ पोलीस अधिकारी आणि १७३२ पोलीस कोरोना बाधित आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ना. देशमुख पुढे म्हणाले कि,
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ५२ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५६, ठाणे शहर १४ व ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी,रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १ ,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी, नवी मुंबई SRPFअधिकारी १,पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १,औरंगाबाद शहर ३,जालना १,नवी मुंबई २, सातारा१, अहमदनगर २,औरंगाबाद रेल्वे १,SRPF अमरावती १, पुणे रेल्वे अधिकारी१, PTS मरोळ अधिकारी १,SID मुंबई १,नागपूर २, बीड १,सोलापूर ग्रामीण १ अशा ११७ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २४८ पोलीस अधिकारी व १७३२ पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!