पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर व तालुक्या साठी आजचा दिवस अद्याप तरी दिलासादायक ठरला आहे. आज प्राप्त झालेले सर्वच 53 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान आणखी 71 अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे त्या अहवालात काय दडले आहे याकडे लक्ष लागले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील 124 लोकांचे swab 3 मार्च रोजी तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 4 जूलै रोजी 7 अहवाल पॉझिटिव्ह आले तर आज 5 जुलै रोजी 53 अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे रविवार चा दिवस पंढरपूरकरांसाठी दिलासादायक ठरला आहे.
उर्वरित 71 तपासणी अहवाल सोमवारी मिळण्याची शक्यता असून त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.