पंढरपूर : ईगल आय न्यूज
श्रीपूर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आ प्रशांत परिचारक यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन चा साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे इथे 18 सप्टेंबर रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पांडुरंग परिवाराच्या सर्वच संस्थांचे प्रशांत परिचारक हे मार्गदर्शक आहेत. सप्टेंबर 2020 पासून प्रशांत परिचारक हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन यांच्यामार्फत 2021 साला करिता “साखर उद्योग गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.