भूमिपुत्र उमेदवारांला संधी द्या : आ प्रशांत परिचारक

समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे सभा संपन्न


मंंगळवेढा : ईगल आय मीीडिया


मंगळवेढ्यात आता 40 वर्षांनंतर उमेदवारी आली आहे, भूमिपुत्र म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना माझ्यासोबत मुंबई ला पाठवा, असे आवाहन आ प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढ्यात झालेल्या प्रचार सभेत केले.


भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराथ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा दौरा केला, या वेळी शहरात झालेल्या सभेत परिचारक बोलत होते.


2009 पासून लोकप्रतिनिधी उपसा सिंचन योजना सांगून मते मिळवत आहेत, मात्र अद्याप कागदाच्या पलीकडे काहीही झालं नाही.
ही निवडणूक विचाराची आहे, कोणाचा सातबारा नाही नावावर करायला. त्यामुळे 33 टक्के मते मिळवत आमदारकी पदरात पाडायचे. आम्ही 67 टक्के असून ताकद विभागली असल्याने पराभूत होत होतो. आणि म्हणून आम्ही ठरवले की, आता याना सरकोली दाखवायची.

ते अफवा उठवतात हे फुटले ते फुटले पण अस काही होणार नाही. जवळपास दीड लाख मते आम्ही गोळा करायची ठरवली आहेत,
पंढरपूर मधून आम्ही त्यांना रोखून धरतो, तुम्ही इथून लीड द्या आन आवताडे याना आमदार करा असे आवाहन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!