नातेपुते : महाविद्यालयात लोकनेते माजी खा. प्रतापसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नातेपुते : ईगल आय मीडिया
लोकनेते माजी खा.स्व.प्रतापसिंह मोहिते – पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव महाविद्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ चंद्रकात कोळेकर तसेच प्रमुखअतिथी म्हणून पं.स सदस्य ज्ञानराज पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ चंद्रकात कोळेकर म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी ताकद दिली. जिल्ह्यातील अनेक आमदार खासदार त्यांच्या मुशीत घडले. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.ख-या अर्थाने जिल्ह्याच्या घडघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे,असे डॉ.कोळेकर यांनी सांगितले. यावेळी पं.स. सदस्य ज्ञानराज पाटील, प्रा.उत्तम सावंत,प्रा.रज्जाक शेख,यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्या १०० माथाडी कामगारांना ज्ञानराज पाटील व जनसेवा नेते सुनिल गजाकस यांच्या हस्ते मास्क व सेनिटायझर चे वाटप केले. तसेच महाविद्यालय प्रांगणात १०० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रा.राजेंद्र खंदारे,प्रा.थोरात, प्रा.मुळीक सर तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा.बाळासाहेब निकम यांनी केले व आभारप्रदर्शन प्रा.साळवे यांनी मानले.