चिंचणी गावच्या विकासासाठी प्रिसिजन सर्वतोपरी सहकार्य करेल : यतिन शहा


प्रिसिजनच्या  निधितील सौर प्रकल्पाचे लोकार्पण

फोटो
चिंचणीतील सौर प्रकल्पाची पाहणी यतीन शहा आणि सुहासिनी शहा यांनी केली.

पंढरपूर : eagle eye news

  चिंचणीकरांनी केलेले काम बघून मी भारावून गेलो आहे, या गावचा ब्रँड अँबेसिडर म्हणून जिथे जाईल तिथे मी या गावचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याचा  प्रयत्न करीन, आता मी तुमच्यासोबत आहे. आम्ही एकदा सोबत केली की सोडत नाही. त्यामुळे आपण चिंता न करू नका या गावाला व्हायब्रंट करण्यासाठी प्रिसीजन  कायम सोबत राहील, असे प्रिसिजन चे प्रमुख यतीन शहा म्हणाले.

तालुक्यातील चिंचणी येथे प्रिसिजनच्या सी एस आर फंडातून उभे केलेल्या पाणी पुरवठा सौरपंप आणि 35 सौर पथदिव्यांचे लोकर्पण यतिन शहा आणि डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले.या  वेळी बोलताना प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा यांनी सांगितले की, गावच्या विकासात महिलांचा सहभाग वाढला तर, ते गाव आत्मनिर्भर होऊ शकते. हे या गावातील महिलांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखविले. 


 तालुक्यातील चिंचणी येथे प्रिसिजनच्या सी एस आर फंडातून उभे केलेल्या पाणी पुरवठा सौरपंप आणि 35 सौर पथदिव्यांचे लोकर्पण यतिन शहा आणि डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. चिंचणी गावचा पाणी पुरवठा पंप आणि गावातील ३५  पथदिवे सौर उर्जेवर चालतात. संध्याकाळी सूर्यप्रकाश कमी झाला की दिवे चालू होतात. दिव्याखाली मानवी हालचाल झाली की त्याचा प्रकाश वाढतो. या सर्व सौर यंत्रणेसाठी प्रीसिजन कंपनीने सी एस आर निधीतून तीस लाख रुपये खर्च केले आहेत. 


 पुढील काळात या गावाने बायोगॅस आणि सहकारी तत्वावरील नैसर्गिक शेती यावर भर देण्याचे  आवाहन केले. यावेळी लोकार्पण सोहळ्याच्या अगोदर शहा कुटुंबीयांनी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र येथे सुरू असलेल्या हुरडा पार्टीचा पाहुणचार घेतला. यावेळी माधव देशपांडे, संदिप पिस्के, मोडक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहन अनपट यांनी केले तर सूत्रसंचालन समाधान काळे सर यांनी केले.  स्वागत शशिकांत सावंत व आभार चंद्रकांत पवार यांनी  मानले. यावेळी गावातील ग्रामस्थ व  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


असा आहे  ‘प्रिसिजन- चिंचणी’चा सौरऊर्जा प्रकल्प !

प्रिसिजन उद्योगसमूहाने आपल्या सीएसआर फंडातून चिंचणीमध्ये गावातील स्मशानभूमी येथील बोअर वर 5 हॉर्स पावर एवढ्या क्षमतेचे सौर ऊर्जा संच, तसेच पाणीपुरवठा विहिरी वर 12 हॉर्स पावर एवढ्या क्षमतेचे पंप चालतील असे सौर ऊर्जा संच बसवले आहेत. गावात ३५ सौर दिवे बसवले आहेत. या ठिकाणी अपारंपारिक ऊर्जास्रोत वापरल्यामुळे चिंचणीकरांचं वीजेवरचं अवलंबित्व खूप कमी झाले  आहे. तसेच गावातील संपूर्ण  सार्वजनिक ठिकाणावरील पथदिवे हे आता सौरऊर्जेवर सुरु केले आहेत. 

Leave a Reply

error: Content is protected !!