खासगी रुग्णालयांनी सेवा देणे बंधनकारक : सचिन ढोले

 पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांनी  कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी  80 टक्के खाटा  राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने काढलेल्या आदेशाचे खाजगी रुग्णालयांनी पालन करुन रुग्णांना वैद्यकीय सेवा द्याव्यात अशा सूचना  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

            राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपत्तीकालिन व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायद्यामधील तरतुदीनुसार खाजगी रुग्णालयांनी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. खाजगी रुग्णालयांना  कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी शासन आदेशानुसार जे दर निश्चित करुन देण्यात आले आहेत. त्या प्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.  प्रत्येक रुग्णांला उपचार मिळणे आवश्यक असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालय मिळून समन्वयाने काम करुन, कोरानावर मात करुया, असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.

            प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांची  प्राधान्याने आरोग्य तपासणी करण्यात येत असून, जेष्ठ नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!