सर्वपक्षीयांच्या वतिने रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते.
फोटो
उपरी येथे दूध दर कपाती च्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असल्याचे दिसते.
प्रतिनिधी : पंढरपूर
खाजगी दूध संघानी दूध दर कपात केल्याच्या निषेधार्थ उपरी ( ता. पंढरपूर ) येथे पंढरपूर – सातारा मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थतीत होते.
यावेळी बोलताना, शिवसेना युवासेनेचे रणजित बागल म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे दुग्धविकास मंत्री आहेत, त्यांनी पालकत्व स्विकारलेल्या जिल्ह्य़ातच जर दुग्धविकास उत्पादक शेतकऱ्यांना जर दरासाठी लढावे लागत आहे. ‘दुध उत्पादक शेतकर्यांसोबत अन्याय सुरू असताना हे सरकार मात्र बघ्याच्या भुमिकेत आहेत, दुध संघ मालकांविरोधात कोणतीही साधी नोटिस देखील देण्याचे धाडस या सरकारचे होत नाही, दुध संघ व सरकार यांचे साटेलोटे तर नाही ना असा प्रश्न आता जनतेला पडतो आहेत.
यावेळी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, विठ्ठल सहकाराचे संचालक साहेबराव नागणे, सचिन पाटील, विश्रांती भुसनर, छगन पवार, सचिन आटकळे, शशिकांत नागटिळक,निवास नागणे, दिपक सुरवसे, पार्थ सुरवसे, विक्रांत जगदाळे, शहाजी जगदाळे,यांसह दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.