शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ करमाळा येथे धरणे आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

टीम : ईगल आय मीडिया

केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन शेती विषयक कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने सदरचे आंदोलन दडपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न चालू केला आहे. परंतु सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या वतीने सर्व पक्ष, संघटनांनी आज एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

सदर आंदोलनाचे नेतृत्व दशरथ कांबळे, ॲड. सविता शिंदे, डॉ.अमोल दुरंदे यांनी केले. 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे जो हिंसाचार घडवून आणला त्याचा या आंदोलनात निषेध करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनांच्या ठिकाणचे पाणी व वीज पुरवठा बंद केला आहे, आंदोलकांवर दबाव टाकणे, धमकावणे अशी कृती चालू केलेली असून त्याचाही तीव्र निषेध करण्यात आला. सदरची कृती पूर्णतः लोकशाहीविरोधी व संविधान विरोधी असल्याचे करमाळा येथील आंदोलकांनी सांगितले.


करमाळा येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, प्रहार, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार संघर्ष समिती, भारिप बहुजन महासंघ, भीम दल, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आदि संघटना सहभागी झाल्या होत्या.


केंद्र सरकारने पारित केलेले सर्व शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, हिंसा वादी व्यक्तींना पुरस्कृत करून शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने बंद करावेत, शेतकरी आंदोलकांवर दाखल केले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, शेतकरी आंदोलकांच्या विरोधात पोलिस प्रशासनाकडून सुरू झालेली मारहाण दडपशाही त्वरित बंद करावी, 26 जानेवारी रोजी लाल किल्ला व दिल्लीत इतरत्र भाजप पुरस्कृत व्यक्तींनी केलेल्या हिंसेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा इत्यादी मागण्या धरणे आंदोलनात करण्यात आल्या.


धरणे आंदोलनामध्ये विजया कर्णवर, गजानन ननवरे, नलिनी जाधव, दादासाहेब लबडे, आर आर पाटील, सुदर्शन शेळके, सुनील भोसले, संदीप तळेकर, अमोल घुमरे, दीपक शिंदे, बापू फरतडे, नानासाहेब मोरे, संजय घोलप,अश्फाक जामदार, कयूम शेख, बापू फरतडे गणेश सव्वाशे, अमित घोगरे, अतुल वारे, अमोल कुलकर्णी, महेश कुमार कुलकर्णी, विशाल गुणवरे, तानाजी झोळ, संदीप मारकड, शहाजी देशमुख, राजाभाऊ कदम, मधुकर मिसाळ, औदुबर मोरे, बापू कोकरे, शँकर पोळ,गायत्री कुलकर्णी, बापू वाडेकर, दादासाहेब जाधव, पांडुरंग गायकवाड, कविता जाधव, सोमनाथ वाघमारे, बाळू कारंडे, मानसिंग खंडागळे, संदीप माकड, बापू वाडेकर, स्वप्नील गोडगे, प्रमोद बदे, संतोष वारे, उदयसिंह मोरे पाटील, भास्कर पवार, प्रशांत तकीक, अविनाश डावरे ई.कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नांवर पथनाट्य सादर केले. आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार बदे व जाधव यांनी स्विकारले.

Leave a Reply

error: Content is protected !!