गोविंदबागे समोर खर्डा – भाकर आंदोलन यशस्वी

पवारसाहेबांपर्यंत आमची मागणी पोहचवली ; काय निर्णय घेतात ते पाहु : नागेश वनकळसे

बारामती पोलिसांना समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

मोहोळ : ईगल आय मिडीया


इंदापूरला पळविलेले उजनीचे पाच टीएमसी पाणी माघारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व खा. शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानासमोर खर्डा-भाकर आंदोलन करण्यात आले.   स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नागेश वनकळसे व सचिव महेश पावर यांनी गनिमीकावा करून पोलिसांना चकवा देत गोविंदबागेत जाऊन आंदोलन यशस्वी केले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांवर प्रचंड दबाव टाकून आंदोलकर्ते बारामती ला न पोहचू देण्याची सर्वतयारी केली होती. अनेकांना मोहोळ व कामती पोलिसांनी नजरकैदेत ठेवले तर रात्रभर अनेकांच्या घरावर पाळत ठेवली.


उजनी धरणातून सांडपाण्याच्या नावाखाली पाच टीएमसी पाणी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सूचनेवरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविले आहे मात्र तो आदेश आम्ही रद्द करतो अशी केवळ घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली परंतू आजतागायत त्याचा शासकीय आदेश देण्यात आला तर उलटपक्षी ना.अजित पवारांनी किती सांडपाणी धरणात येते याचे मोजमफ करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली त्यामुळे यांच्या मनात खोट आहे हे दिसून आले त्यामुळे 

स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने बारामती येथे गोविंदबागेत खर्डा भाकर आंदोलन जाहीर  केले होते. ते आंदोलन होऊ नये आंदोलनकर्ते बारामती येथे पोहचू नये यासाठी पालकमंत्री  भरणे यांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावली. मोहोळ पोलीस निरीक्षक व कामती सहा.पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून समितीच्या सदस्यांना गोड बोलून बोलवून घेतले व नजरकैदेत ठेवले. तर अनेकांना आपल्या व्हाट्स अप चे स्टेटस काढण्यास सांगितले, जे पदाधिकारी पोलिसांना सापडले नाहीत त्यांच्या घरावर रात्रभर पाळत ठेवली होती. तर बारामती ला जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अश्याही कठीण परिस्थितीत अनेक समितीचे  पदाधिकारी  शेतकरी बारामती कडे निघाले परंतू अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यातूनही अध्यक्ष नागेश वनकळसे व सचिव महेश पवार हे दोघे मोटारसायकल वरून चोर रस्त्याने रात्रभर प्रवास करीत सकाळी ६ :३० वाजनेच्या सुमारास  बारामती पोहचले. पोलीस प्रशासन झोपेत असतानाच  आपली न्याय मागणीसाठी आंदोलन केले. आंदोलनानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बारामती पोलिस प्रशासनाच्या पथकाने आंदोलकांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सुखरुप सोडले.


यावेळी बोलताना नागेश वनकळसे म्हणाले की, रात्रभर एखाद्या आरोपींचा पाठलाग केल्यासारखे पोलीस आमच्या मागे पळत होते. सतत मोबाईल करुन आम्ही कुठे आहोत विचारीत होते. परंतू आम्ही त्यांना कसलीही माहिती दिली नाही. आम्ही गोविंद बागेत गेलो होतो, हे ही त्यांना आम्ही मोहोळ येथे पोहचल्यावर समजले. आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी गेलोच नाही अशी भावना पोलिसांची झाल्यामुळे रात्रभर पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी आम्हला बारामती पोलीस ठाण्यात चांगली वागणूक दिली  तर बारामतीचे पोलीस निरीक्षक महेश ढवण यांनी या बाबत सिल्व्हर ओक येथे फोन लावून  खा.शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश  राऊत यांच्याशी संवाद घडवून आणला  आमची रास्त मागणी खा. शरद पवार यांच्या पर्यंत पोहच झाली आहे  या बाबत पवारसाहेब काय  निर्णय देतात हे पहावे लागेल .


यावेळी समन्वयक शिवाजीराव चव्हाण, प्रवक्ते बापूसाहेब काळे, उपाध्यक्ष नानासाहेब सावंत, विष्णू पाटील, सचिव महेश पवार  , प्रसिद्धीप्रमुख दादाराव पवार, संघटक अमर चव्हाण, युवा नेते हर्षल देशमुख, शहाजी केदार यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!