रात्री फिरायला गेले असता अज्ञात मारेकऱ्यांनी केला हल्ला
सांगोला : ईगल आय न्यूज
सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेमणूक पोलीस उपनिक्षकाची सांगोला तालुक्यातील वासुद येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सूरज विष्णू चंदनशिवे असे खून झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्याकडून पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद (ता. सांगोला) असे खून झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हे सांगोला तालुक्यातील जवळा गावाचे जावई आहेत. ते सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत होते.ही घटना आज बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास वासुद ( ता. सांगोला) येथील केदारवाडी रोडवर उघडकीस आली.
पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद ( ता.सांगोला ) जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून खून केला. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.