डॉ.आबासाहेब रणदिवे यांचेकडून मोफत काढा वाटप
तुंगत : ईगल आय मीडिया
तुंगत ( ता.पंढरपूर )येथे कोरोना रुग्ण सापडल्या नंतर कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी तुंगतकरांनी उत्स्फूर्तपणे 3 दिवसांचा जनता कर्फ्यु पाळला आहे. या दरम्यान संपूर्ण गाव कडकडीत बंद आहे. तसेच गावातील ख्यातनाम वैद्य डॉ. आबासाहेब रणदिवे यांनी ग्रामस्थांना आयुर्वेदिक काढा मोफत वितरण केला.
पंढरपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे . त्यातच राजूबापू पाटील यांच्या सारख्या नेत्यासही कोरोनाने सोडले नाही. ग्रामस्थांना धक्काच बसला . यामुळे तालुक्यातील गावा गावात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे .
तुंगत येथेही गेल्या पंधरा ते वीस दिवसात वीस ते बावीस कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत . त्यामुळे तुंगत ग्रामपंचायतीच्या वतीने तीन दिवस जनता कर्फ्यूचेआवाहन करून दि.१५ ते १७ ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे गाव बंद ठेवले आहे.
या कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी डॉ.आबासाहेब रणदिवे यांनी कन्या चि.वेदिका हिच्या वाढदिवसानिमित्त सलग दहा दिवस तुंगत येथील सर्व लहानपणापासून वृद्धांपर्यंत सर्वांना ‘प्राणरक्षक’आयुर्वेद काढा घरोघरी मोफत वाटप करीत आहेत. डाॅ.रणदिवे यांच्या या उपक्रमास ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या विनामोबदला सेवेबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
गावात कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी आरोग्य केंद्राचे डाॅ. नवत्रे ,डाॅ.रेपाळ व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच आगतराव रणदिवे ,उपसरपंच वैशाली लामकाने ,पोलीस पाटील साधना देठे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इंद्रजीत रणदिवे व ग्रामपंचायतीचे कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
यापूर्वीही ही ग्रामपंचायतीने तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि.१५ ते १७ ऑगस्टपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे असे ग्रामपंचायतीच्या आवाहन केले होते .यावेळीही जनता कर्फ्यूस ग्रामस्धाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.