पूजा चव्हाणच्या पोस्ट मार्टम चा अहवाल आला

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं मृत्यूचं खरं कारण

टीम : ईगल आय मीडिया


पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना सांगितलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीतील सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात चर्चेत आल्यानंतर सगळ्याचं कान घटनेच्या घडामोडींकडे लागल्याचं दिसत आहे. राजकीय वर्तुळात हा विषय ज्वलंत बनत असल्याचं चित्र असून, भा.ज.पा.कडून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आता पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून, तिचा मृत्यू कशामुळे झाला ? याच कारण समोर आलं आहे. पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल पुणे पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.
वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बोलवून घेतलं होतं.
दीपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

Leave a Reply

error: Content is protected !!