उजनीत येणारा विसर्ग ही घटला : तरीही पाणी साठा 21.39 टक्के
पुणे : ईगल आय मीडिया
गेल्या 3 दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाचा जोर ओसरला असून 19 पैकी 10 धरणांवर 0 ते केवळ 8 मिमी पाऊस पडला आहे. त्याचा परिणाम होऊन उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग घटला आहे. शनिवारी सकाळी उजनी धरणातील पाणी साठा 21. 39 टक्के इतका झाला आहे.
गेले दोन महिने पुणे जिल्ह्यावर रुसलेला पाऊस मागील 4 दिवसांत प्रसन्न झाला होता. या दरम्यान सर्वत्र मध्यम ते अतिवृष्टी स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी वेगाने वाढली आहे. दोन महिन्यात एकही धरणावर 1 हजार मिमी पाऊस नोंदवला गेला नव्हता. मात्र 4 दिवसांत झालेल्या पावसाने 5 धरणावर 1 हजार मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे उजनीत दौंड येथून येणार पाण्याचा विसर्ग 17 हजार क्यूसेक्स पर्यंत वाढला होता. त्यामुळे आपकमाईवर सुरू असलेली उजनी कूर्म गतीची वाढ झपाट्याने वधारली.
उजनी धरणात शनिवारी सकाळी 21.39 टक्के इतका पाऊस झाला आहे. तर पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये सुद्धा समाधानकारक पाणी साठा सुरु झालेला आहे.
निरेच्या खोऱ्यातील पाणी साठा
शुक्रवारी सकाळी 6 वाजता नीरा देवघर धरणाची पाणी पातळी 51. 15 टक्के होती. तर भाटघर धरणाचा साठा 63.75 टक्के एवढा असून वीर धरणाचा पाणी साठा 81.88 टक्केवर गेला आहे. निरेच्या खोऱ्यातील गुंजवणी धरणात 80.71 टक्के पाणी साठा झाला आहे.
नीरा खोऱ्यातील 4 ही धरणांत एकूण 61 टक्के इतका पाणी साठा झाला आहे.