आ.प्रशांत परिचारक उमेदवार : संग्राम देशमुख
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आज परिचारक गटाच्या वतीने पदवीधर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उमेदवार संग्राम देशमुख स्वतः उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आम. प्रशांत परिचारक यांनी केले आहे. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे आहेत. परिचारक गटाच्यावतीने त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आणि पदवीधरांची बैठक येथील श्रीराम मंगल कार्यालयात दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या संदर्भात गावागावात परिचारक समर्थक कार्यकर्त्यांना निरोप दिले गेले आहेत, तसेच सर्वांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.