टीम : ईगल आय मीडिया
पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची इमारत आहे. कोव्हिशील्ड या कोरोना लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आली. या इमारतीत आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 3जणांना वाचवण्यात यश आले असून आणखी लोकांचा शोध सुरू आहे.
करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली असून चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित आहेत. सुदैवाने ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती होणारं ठिकाण सुरक्षित असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे.
मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.
स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सीरमची मांजरीत जी नवी इमारत उभारण्यात आली आहे त्याच्या एका बाजूला आग लागली आहे. अग्निशन आणि इतर यंत्रणा तिथे उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न सुरु आहे. लस तयार करणाऱ्या युनिटला कोणताही धोका नाही. आकाशवाणी परिसरातील जुन्या ठिकाणी लसीचं सर्व काम चालतं. जीवितहानी झालेली कोणतीही माहिती नसून लस निर्मितीला कोणताही धोका नाही/ आगीचं कारण अस्पष्ट असून सध्या त्याबद्दल काही सांगू शकत नाही”.
अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पाच मजल्यांची इमारत असून तीन माळ्यांवर आग पसरली आहे. धुराचं प्रमाण जास्त आहे. चार लोक अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तिघांना आम्ही सुखरुप बाहेर काढलं असून अजून शोध सुरु आहे. १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. यामध्ये नेमकं काय मटेरिअल आहे याची माहिती मिळवत आहोत. धूर कमी होत नाही तोवर आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण आहे”.
इन्सिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही”. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवत असून इमारतीत कोणते कर्मचारी अडकले आहेत का ? याचीही पाहणी करत आहेत. दरम्यान आजुबाजूला लोकवस्ती असल्याने आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.