6 वर्षात आ.दत्तात्रय सावंत प्रत्येक शाळेत पोहोचले : कार्याध्यक्ष मारुती गायकवाड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

विरोधाला विरोध म्हणून दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या समोर उभा असणाऱ्या शिक्षक मतदार संघातील एका उमेदवाराने पदवीधर मधून उभा आहे असे म्हणत शिक्षकांना मते मागितली, त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण काय असणार असा प्रश्न विचारत शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ वेगळे असतात हेही माहिती नसलेल्या उमेदवाराला मत मागायचा अधिकार नाही असे मत राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष मारुती गायकवाड यांनी व्यक्त केले.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील कोल्हापूर मधील एका उमेदवाराने चक्क पदवीधर मधून उभा राहिलो असून मतदान देण्याचे आवाहन शिक्षकांना केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. केवळ एखाद्या राजकीय पक्षाने पाठिंबा दिल्याने कोण विजयी होऊ शकत नाही त्यासाठी शिक्षकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे असा टोला मारुती गायकवाड यांनी लावला.


कर्तृत्वावर दत्तात्रय सावंत पुन्हा विजयी होतील
आ दत्तात्रय सावंत यांनी सहा वर्षात पुणे कोल्हापूर सातारा सांगली व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी आमदार निधी सह संघटनेच्या माध्यमातून महापुरग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना भरीव मदत केली आहे, शासनास शाळांना वेतनेतर अनुदान, विना अनुदानित शाळांना व शिक्षकांना वेतन अनुदान मिळवून देण्यात यश आले असुन पुढील कार्यकाळात १००टक्के अनुदान सर्व शिक्षकांना आ दत्तात्रय सावंत हेच मिळवून देतील असा विश्वास संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी व्यक्त केला

दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी २०१४ला कॉग्रेस पक्षाच्या मोहन राजमाने या उमेदवाराचा पराभव केला होता, आ दत्तात्रय सावंत यांनी सहा वर्षात ५८तालुक्यांचा मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक शाळेस आमदार निधी देण्याचा प्रयत्न केला, संस्थेचे, मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे व सेवकांचे वैयक्तिक प्रश्न लक्ष देऊन सोडवले आहेत. त्यामुळे त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महापुरामुळे त्या भागातील शाळांचे मोठे नुकसान झाले होते, त्यांना शालेय साहित्य संघटनेच्या माध्यमातून भरीव मदत केली होती. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम राज्य शाळा कृती समितीने केली होती.

अकरा वर्षे विना अनुदानित शाळेत काम करीत संघर्ष करीत संघटना स्थापन करून सरकारला अनुदान देण्यास सावंत यांनी भाग पाडले, एवढेच नव्हे तर कायम विना अनुदानित शाळेचा कायम शब्द काढून त्यांना ही अनुदान मिळवून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या संघटनेमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे शिक्षक सामील झाले आहेत. दत्तात्रय सावंत यांनी केलेल्या कार्यावर शिक्षक मतदान करतील व विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास मारुती गायकवाड यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

error: Content is protected !!