पुणे शिक्षक : पहिल्या पसंती क्रमाचा कोटा पूर्ण करण्यात सगळेच नापास

2 नंबरच्या मतांवर ठरणार विजयी उमेदवार

टीम : ईगल आय मीडिया

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची पहिल्या पसंती क्रमाची मतमोजणी पूर्ण झाली असून पहिल्या पसंती क्रमाचा कोटा कोणत्याही उमेदवारास पूर्ण करता आलेला नाही त्यामुळे विजयी उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मतमोजणी नंतरच निश्चित होणार आहे.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार आहेत. या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी वैध मतांची पहिल्या पसंती क्रमाची मोजणी गुरुवारी रात्री उशिरा पूर्ण झाली. पहिल्या पसंती क्रमाच्या मतांचा कोटा एकही उमेदवार पूर्ण करू शकला नाही.

वैध 50 हजार 226 मतांपैकी काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना सर्वाधिक 16 हजार 874 मते मिळाली, अपक्ष दत्तात्रय सावंत याना 11 हजार 24 मते मिळाली, भाजप पुरस्कृत शिक्षक पारिषदेचे जितेंद्र पवार यांना 5 हजार 795 मते मिळाली. लोकभारती पक्षाचे उमेदवार गोरखनाथ किसन थोरात याना 4515 मते मिळाली,

अपक्ष प्रा. प्रकाश पाटील यांना 2365 मते मिळाली. आणि अपक्ष रेखा दिनकर पाटील यांना 1689 मते मिळाली. बाकी इतर उमेदवारांना 1 हजारपेक्षा कमी पहिल्या पसंती क्रमाची मते मिळाली आहेत.

त्यामुळे आता पुणे विभागीय शिक्षक आमदार दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणी नंतर निश्चित होणार असल्याने त्या मतमोजणीकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!