पुणे शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत

काँग्रेस – भाजपच्या नवख्या उमेदवारांसमोर दत्तात्रय सावंत यांचे तगडे आव्हान

टीम : ईगल आय मीडिया

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार नशीब आजमावत असले तरी मुख्य लढत ही महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे उमेदवार दत्तात्रय सावंत, भाजपचे जितेंद्र पवार आणि काँग्रेसचे जयंत असगवकर यांच्यात तिरंगी होणार आहे. त्यातही भाजप पुरस्कृत शिक्षक परिषद आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार नवीन चेहरे आहेत.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी 15 जणांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 35 उमेदवार आहेत. त्यामध्ये भाजपचे जितेंद्र पवार, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि राज्य शाळा कृती समितीचे दत्तात्रय सावंत हे प्रमुख 3 उमेदवार आहेत. यापैकी जितेंद्र पवार हे सोलापूर येथील दयानंद काशीनाथ असावा प्रशाला येथे मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. क्रीडाशिक्षक म्हणून ते परिचित आहेत. १९९२ पासून संघटनेत सक्रिय आहेत. परिषदेने निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रचारप्रमुख म्हणून सातारा येथील अमित कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार जयंत असगावकर हे शिक्षन संस्था संघटनेचे सचिव आहेत.

गतवेळी शाळा कृती समितीचे अधिकृत अपक्ष उमेदवार दत्तात्रय अच्युतराव सावंत याना 14 हजार
कॉग्रेस उमेदवार मोहन राजमाने साडेबारा हजार
व भाजप पुरस्कृत भगवान साळुंखे यांना 11 हजार मते मिळाली होती

मागील 6 वर्षे या विभागाचे प्रतिनिधित्व करणारे दत्तात्रय सावंत हे सुध्दा सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक मतदारांशी मोठा संपर्क आहे, शिवाय 6 वर्षे संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक शिक्षकांशी सावंत यांचा संपर्क आलेला आहे. आमदार निधीतून बहुतांश शाळांना साहित्य, मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शाळा, शिक्षक आणि शैक्षणिक धोरणाबाबत सावंत यांनी जागृत राहून सभागृहात तसेच बाहेर सुद्धा आवाज उठवला आहे. विशेषतः कायम विना अनुदानित शिक्षक आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सावंत यांनी शेकडो किमी पायपीट करून पायी दिंडी सारखी आंदोलने केली आहेत. त्यामुळे सावंत यांची संपूर्ण मतदारसंघात चांगली, कार्यक्षम आमदार अशी ओळख निर्माण झाली आहे.

या तुलनेत काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार नवखे आहेत. या विभागात काँग्रेस चे संघटन अतिशय दुबळे आहे, आणि बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चा प्रभाव दिसून येतो. विशेष म्हणजे यावेळी रयत शिक्षण संस्थेचा उमेदवार निवडणूक रिंगणात नाही त्यामुळे रयतच्या शिक्षकांचा कौल निर्णायक ठरणार आहे. सातारा,सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर या पाचही जिल्ह्यात रयतेच्या मतदार शिक्षकांची संख्या मोठी आहे.

सद्यस्थितीत पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होत असून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराना राज्य शाळा कृती समितीचे दत्तात्रय सावंत यांचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!