पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ : महाविकास आघाडी जोमात !

प्राथमिक माहितीनुसार आसगावकर : अरुण लाड आघाडीवर , अपक्ष दत्तात्रय सावंत यांचे मोठे आव्हान

टीम : ईगल आय मीडिया

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या पसंतीमध्ये काँग्रेस चे उमेदवार जयंत आसगावकर आघाडीवर आहेत असे समजते. त्यांच्याशी अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचे कडवे आव्हान असल्याचे दिसून येते.

दरम्यान, पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी चे उमेदवार अरुण लाड यांची आघाडी कायम असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या जागेवर अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात चुरस दिसून येत आहे.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर, अपक्ष दत्तात्रय सावंत, शिक्षक परिषदेचे जितेंद्र पावर आदी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खरी लढत काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यात असल्याचे सुरुवातीच्या कलानुसार दिसून येते.

प्राथमिक अंदाजानुसार आसगावकर आघडीवर असल्याचे समजते. मात्र अद्याप अधिकृत माहिती निवडनुक विभागाकडून सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार आसगावकर आणि सावंत यांच्यात चुरस असल्याचे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!