वास्तवातील पुष्पा पकडला !

सांगली पोलिसांनी अडीच कोटींच्या चंदनासह आरोपीस घातल्या बेड्या

टीम : ईगल आय मीडिया

आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करीमार्गाने आलेल्या दोन कोटी 45 लाख 85 हजार रुपयांचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदन मिरजे पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या चंदन तस्करीवर आधारित पुष्पां चित्रपट चर्चेत असतानाच करोडो रुपयांची चंदन तस्करी समोर आली आहे.

चोरीच्या मार्गाने रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.
संबंधित बातम्या

त्यानुसार फडणीस यांनी मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा ( क्रमांक KA 13, 6900 ) हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. आरोपीसह ते जप्त करण्यात आले असून हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!