पंढरपूर तालुक्यात पहाटेपासून संततधार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात सर्वच भागात बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून संसतधार सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील ओढे,नाले पुन्हा दुथडी वाहू लागले आहेत. आणि यामुळे उभी पिके आता पाण्यामुळे सडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंढरपूर तालुक्यात यंदा जूनपासूनच सातत्याने पाऊस पडत आहे. त्यातच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या 4 दिवसांपासून दररोज पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून सर्वदूर भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतो आहे. अगोदरच जमिनीची पाणी साठवण क्षमता संपल्याने आता पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब वाहून जाऊ लागला आहे.

बुधवारी पहाटे पासून तालुक्यातील सर्व मंडलात खलीलप्रमाणे पाऊस झाला आहे.
करकंब 22 मिमी.
पट कुरोली 11 मिमी.
भंडीशेगाव 15 मिमी.
भाळवणी 27 मिमी.
कासेगाव 22 मिमी.
पंढरपूर 31 मिमी.
तुंगत 25 मिमी.
चळे 31 मिमी.
पुळुज 13 मिमी.सर्व मंडलात
एकूण पाऊस 197 मिमी.एवढा पाऊस झाला असून
सरासरी पाऊस 21.88मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!