25 पैकी 3 धरणांवर दोन अंकी पाऊस नोंद
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या 40 दिवसांपासून भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यावर पाऊस रुसलेला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतरही भीमा खोऱ्यात 25 पैकी 22 धरणांवर 0 ते 6 मिमी एवढ्या अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे.
उजनी धरण साठीतच !
गेल्या 40 दिवसांपासून उजनी धरणातील पाण्यात 1 टक्का ही वाढ झालेली नाही. उलट पाणी कमी झाले असून आज सकाळी 8 वाजता धरणातील पाणी साठा 60.80 टक्के एवढा होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुढील तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला असल्याने भीमा खोऱ्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील 3 दिवसांतील पावसाकडे लागले आहे. अन्यथा आता परतीच्या पावसावरच मदार अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.